
जळगावातील कंजरवाड्यात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; हजारो लिटर हातभट्टी दारू व कच्चे रसायन नष्ट
जळगावातील कंजरवाड्यात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; हजारो लिटर हातभट्टी दारू व कच्चे रसायन नष्ट
जळगाव : कंजरवाडा परिसरात अवैध हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी पहाटे सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल अडीच ते तीन हजार लिटर कच्चे रसायन, हातभट्टीसाठी लागणारे साहित्य आणि भट्टीचे अवजार जागेवरच नष्ट केले. या प्रकारामुळे अवैध दारू निर्मितीवर मोठा आळा बसला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंजरवाडा येथील बीट क्र. १ मध्ये छापा टाकला. पोलिसांना पाहताच काहीजणांनी पळ काढला, तर काही महिला आणि पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी आढळलेले रसायन, ड्रम, भांडी व अन्य साहित्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले.
या प्रकरणी संबंधित संशयितांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत एपीआय गणेश वाघ यांच्यासह पोहेकॉ चंद्रकांत पाटील, किशोर निकुंभ, पोना आकाश राजपूत, रितेश वंजारी व कविता गवई यांनी सक्रिय सहभाग नोंदवला

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम