
जळगावातील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड
जळगावातील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड
तीन महिलांची सुटका, पाचजण ताब्यात
जळगाव : शहरातील खेडी परिसरात एका कॉलेजजवळ सुरु असलेल्या अवैध कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या दांपत्यासह एक महिला आणि दोन गिऱ्हाईक अशा एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांना खेडी परिसरात एका महिलेने महिलांना पैशाच्या बदल्यात वेश्याव्यवसायात ढकलल्याची माहिती मिळाली होती. काही नागरिकांनी याबाबत तक्रारही केली होती. माहितीच्या आधारे शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गुरुवारी दुपारी चार वाजता कारवाई केली.
प्रथम डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या दांपत्यासह एक महिलेला ताब्यात घेतले. या ठिकाणी असलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन गिऱ्हाईकांना देखील अटक करण्यात आली आहे.
Your message has been sent
उपनिरीक्षक योगेश ढिकले, हेडकॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे आणि महिला पोलिस काजल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम