जळगावातील गणेश मंडळांमध्ये जाऊन सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

बातमी शेअर करा...

जळगावातील गणेश मंडळांमध्ये जाऊन सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

जळगाव प्रतिनिधी, :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा व क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने जळगावातील गणेश मंडळांमध्ये जाऊन सायबर सुरक्षा जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

विद्यापीठातील सायबर सुरक्षा क्लब चे ऑफिसर यांच्यासह २० सायबर स्वयंसेवकानी जळगाव शहरातील नेहरू चौक ते सुभाष चौक पर्यंत सायबर सुरक्षा रॅली काढून व विविध गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन पथनाट्या‌द्वारे माहिती देत दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून जळगाव शहरातील जवळपास सर्वच गणेश मंडळांना भेट देत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सायबर स्वयंसेवकांनी विविध सायबर फसवणुकीवर आधारित पथनाट्यांचे प्रभावी सादरीकरण केले. बेटिंग ॲप फसवणूक, ओटीपी फसवणूक, लिंक फ्रॉड, आणि फोटोमॉर्फिक स्कॅम यांसारख्या गुन्ह्यांवर प्रबोधन करणारे तीन पथनाट्य सादर करण्यात आले. याशिवाय सायबर स्वयंसेवकानी आर्थिक फसवणूक कशी होते, ऑनलाईन गेमिंग फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि इतर सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती देत सायबर फसवणुक झाली तर काय करावे, कोठे तक्रार करावी, ऑनलाईन तक्रार कशी करावी या बदल सविस्तर मार्गदर्शन केले.

सायबर स्वयंसेवकांनी जळगाव शहर महानगरपालिका, नवीपेठ गणेश मंडळ, जनता सहकारी बँक कर्मचारी मंडळ व शहरातील विविध गणेश मंडळात व सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली

या वेळी प्रा. राजू आमले, सायबर क्लब ऑफिसर मयूर बंडे, जानव्ही सपकाळे, भावेश नाले, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते, सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम