
जळगावातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नाशिक परिक्षेत्रात बदल्यांचे सत्र सुरूच
चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची नाशिक ग्रामीण विभागात बदली
जळगावातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नाशिक परिक्षेत्रात बदल्यांचे सत्र सुरूच
चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची नाशिक ग्रामीण विभागात बदली
जळगाव: पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अजूनही सुरू असून, नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नुकतेच जारी केले आहेत. विशेष म्हणजे, या यादीत जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यातच पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसामान्य आणि विनंती बदल्या झाल्या होत्या. मात्र, काही निरीक्षकांनी केलेल्या विशेष विनंत्यांचा विचार करून हे ताजे आदेश काढण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते.
या बदल्यांमध्ये नाशिक ग्रामीणचे हेमंतकुमार भामरे यांना त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात आले आहे. तर, जळगाव येथील प्रदीप देशमुख यांची बदली नाशिक ग्रामीण विभागात करण्यात आली आहे. दुसरीकडे, चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचीही बदली नाशिक ग्रामीण विभागात झाली आहे. नंदुरबारचे हेमंतकुमार पाटील यांनाही त्यांच्या मूळ जिल्ह्यातच कार्यरत ठेवण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन निरीक्षकांची बदली झाल्यामुळे, आता या ठिकाणी कोणते नवे अधिकारी नियुक्त होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नजीकच्या काळात जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात काही नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम