जळगावातील महादेव हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा उपलब्ध

बातमी शेअर करा...

जळगावातील महादेव हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा उपलब्ध

जळगाव : शहरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विद्यानगर आकाशवाणी चौकातील महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव तर्फे आता नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा सुरू करण्यात आली असून वैद्यकिय क्षेत्रात महत्वाचे पाउल टाकले आहे.

किडनीशी संबंधित विविध आजारांचे निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापन या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. किडनीचे आजार आजच्या धकाधकीच्या जीवनात झपाट्याने वाढत आहेत. चुकीचा आहार, पाणी कमी पिणे, रक्तदाब व मधुमेह यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किडनीवर ताण येतो आणि गंभीर समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अत्यावश्यक ठरते. महादेव हॉस्पिटलमध्ये अनुभवी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय जोशी यांच्यासह तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असून रुग्णांना खालील सेवांचा लाभ मिळतो मुतखडा (किडनी स्टोन) उपचार, लघवी कमी होणे, सूज येणे, रक्तदाब नियंत्रणातील अडचणी, डायलिसिस सेवा, दीर्घकालीन किडनी रोग व्यवस्थापन ट्रान्सप्लांटपूर्व आणि ट्रान्सप्लांटनंतर सल्ला व तपासणी रुग्णांच्या सोयीसाठी येथे अत्याधुनिक डायलिसिस युनिट, आधुनिक तपासणी साधने आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी सतत कार्यरत आहेत. तसेच, २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांनाही तत्काळ उपचार मिळू शकतात. महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने जळगाव व परिसरातील रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याचा संकल्प केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, किडनीशी संबंधित कोणतीही तक्रार, जसे की लघवी कमी होणे, अंग सुजणे, थकवा किंवा रक्तदाब वाढणे, याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव हे आरोग्याच्या दृष्टीने विश्वासार्ह ठिकाण ठरत असून, उत्तम आरोग्याची सूरूवात आमच्यापासून या ब्रीदवाक्यानुसार सेवा देत आहे.

सकाळी झोपून उठल्यानंतर डोळ्यांच्या वरच्या बाजूला सूज असणे. चेहरा आणि पायांवर सूज. भूक कमी लागणे, उलटी होणे आणि मळमळ. वारंवार विशेष करून रात्री लघवी होणे. कमी वयात उच्च रक्तदाब. थकवा जाणवणे रक्तातील पोषक घटक कमी होणे. थोडसे पायी चालल्यानंतर दम लागणे, लवकर थकणे. सहाव्या वर्षानंतरही बिछाना ओला करणे. लघवीचे प्रमाण कमी होणे. लघवीच्या वेळी जळजळ आणि त्यातून रक्त आणि पू येणे. लघवी करतांना त्रास होणे, थेंब थेंब लघवी होणे. पोटात गाठ येणे, पाय आणि कंबरदुखी. वरीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळल्यास किडणीचा रोग झाला असल्याच्या शक्यतेचा विचार करून त्वरित डॉक्टरकडे जाऊन तपास करावा. डॉ. अभय जोशी किडनीविकार तज्ञ

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम