
जळगावातील सुभाष चौकातील दहीहंडी श्रीकृष्ण नगर मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी जिंकली
जळगावातील सुभाष चौकातील दहीहंडी श्रीकृष्ण नगर मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी जिंकली
जळगाव: शहरात दहीहंडीचा थरार मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक उंचीची मानली जाणारी, सुभाष चौक मित्र मंडळाची दहीहंडी यंदाही श्रीकृष्ण नगर मित्र मंडळाने जिंकली. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी हा मान मिळवत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी सात मानवी थर रचून तिसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडली.
उद्धवसेनेची निष्ठा दहीहंडीही फोडली
याचबरोबर, उद्धवसेनेच्या ‘निष्ठा दहीहंडी’चा थरारही अनुभवला मिळाला. तरुण कुढापा मंडळाचा गोविंदा यश खोंडे याने रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी नऊ थर लावून ही दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला.
युवतींची दहीहंडी आर. आर. विद्यालयाने जिंकली
सागर पार्कवरील युवतींसाठी खास आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत आर. आर. विद्यालयाच्या पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. त्यांच्याशिवाय, इतर आठ गोविंदा पथकांनाही प्रत्येकी एक दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली.
विजेत्यांचा गौरव
सुभाष चौकातील विजयी श्रीकृष्ण नगर मित्र मंडळाच्या गोविंदाचे नाव गणेश जाधव असून, मंडळाचे अध्यक्ष आकाश घुगे आहेत. आमदार सुरेश भोळे, सुभाष चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, उपमहापौर सुनील खडके यांच्या हस्ते विजेत्या मंडळाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी मनीष अग्रवाल, हरीष चव्हाण, प्रवीण बागर, नरेंद्र कापडणे, आणि सोहम खडके यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम