जळगावातून दुचाकी चोरट्यांना अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा...

जळगावातून दुचाकी चोरट्यांना अटक 

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी I

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दीपक दयाराम रूम (34) व दीपक एकनाथ शैले (31, रेणुकानगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सहाजीब हबीब खाटीक (24, मेहरुण. जळगाव) यांची दुचाकी (एम.एच.19 एआर 5347) ही 11 जानेवारी रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दोघा आरोपींना अटक केली.

एमआयडीसी निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश ठाकरे, अफजल बागवान व शनिपेठचे अनिल कांबळे व पराग दुसाने आदींच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम