
जळगावात ‘आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस’; सम्राट मिहीर भोज जयंतीनिमित्त कार्यक्रम
जळगावात ‘आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस’; सम्राट मिहीर भोज जयंतीनिमित्त कार्यक्रम
जळगाव : महान राजा गुर्जर सम्राट मिहीर भोज यांच्या जयंती दरवर्षी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने यावर्षी मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता जळगाव येथील शासकीय पद्मालय रेस्ट हाऊस येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन वीर गुर्जर सेना तर्फे करण्यात आले असून, समाजातील सर्व बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमास वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक मा. नवलसिंग राजे पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण पाटील व सहकारी उपस्थित राहणार आहेत.
समाजाचा वैभवशाली इतिहास आणि शौर्य यांचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याला गुर्जर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वीर गुर्जर सेनेतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम