जळगावात ईद-ए-मिलादुन नबीनिमित्त ‘ड्राय डे’ जाहीर करण्याची मागणी

बातमी शेअर करा...

जळगावात ईद-ए-मिलादुन नबीनिमित्त ‘ड्राय डे’ जाहीर करण्याची मागणी

जळगाव: ईद-ए-मिलादुन नबीच्या पवित्र दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात दारूबंदी (ड्राय डे) जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे. समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष रिझवान जहांगीरदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, इस्लाममध्ये दारू पूर्णपणे हराम मानली जाते, कारण त्यामुळे समाजात वाईट गोष्टी वाढतात. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दारूवर बंदी आणण्याचा संदेश दिला होता, आणि हा संदेश संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलादुन नबीच्या दिवशी जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, अशी विनंती करण्यात आली.

यावेळी समाजवादी पार्टीचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव रईस कुरेशी, महिला महानगर अध्यक्ष फिरोज शेख, महानगर उपाध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हुसैन बाबा साबरी, युवा अध्यक्ष अजीज मुजावर, महिला उपाध्यक्ष शबाना शेख आणि आबेदा बेग, तसेच अल्पसंख्याक उपाध्यक्ष तौसीफ खान आणि रिझवान खाटीक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम