जळगावात एमजी विंडसर ईव्ही प्रो इलेक्ट्रिक कारचा भव्य

बातमी शेअर करा...

जळगावात एमजी विंडसर ईव्ही प्रो इलेक्ट्रिक कारचा भव्य शुभारंभ  पहिल्याच दिवशी ५० हून अधिक बुकिंग्स

जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योगसमूह सरस्वती ग्रुपच्या सरस्वती एमजी मोटर्स, जळगाव येथे १३ मे रोजी एमजी विंडसर ईव्ही प्रो या अत्याधुनिक इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाचा भव्य शुभारंभ झाला. पर्यावरणपूरकता आणि प्रगत तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या या कारने पहिल्याच दिवशी तब्बल ५० हून अधिक बुकिंग्सची नोंद करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

या शुभारंभ सोहळ्यात सरस्वती ग्रुपचे संचालक श्री. मुकेश टेकवानी व श्री. धवल टेकवानी, प्रतिष्ठीत नागरिक, वाहनप्रेमी ग्राहक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी बोलताना संचालक धवल टेकवानी यांनी सांगितले की, “भारतीय ग्राहक आता पर्यावरणस्नेही आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहनांकडे झुकत आहेत. एमजी विंडसर ईव्ही प्रो ही अशा अपेक्षांना साजेशी कार असून तिचे डिझाईन, कामगिरी आणि फीचर्स हे सर्वगुणसंपन्न आहेत.”

या कारमध्ये ५२.९ kWh क्षमतेची बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर ती सुमारे ४०० किमी अंतर पार करू शकते. यासोबतच गाडीवर १५ वर्षांची गॅरंटी (नियम व अटीसह) देण्यात आली आहे. लेव्हल-२ ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर्समुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित व आरामदायक बनते. स्पीड नियंत्रण, लेन असिस्ट, आणि मागील दरवाजे स्वयंचलितपणे उघडण्याची सुविधा या कारला विशेष बनवतात.

पॉवर स्टेशन फंक्शनलिटीमुळे ही कार इतर उपकरणे किंवा वाहनांना ऊर्जा देऊ शकते – ही सुविधा भारतात प्रथमच एमजीने सादर केली आहे. एमजीच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या सेवांबरोबर सरस्वती ग्रुपच्या ग्राहकाभिमुख सेवांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आकर्षक डिझाईन, उत्तम परफॉर्मन्स आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांमध्ये या कारबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लॉंचिंगच्या दिवशी झालेली बुकिंग संख्या याचेच जिवंत उदाहरण आहे.

सरस्वती ग्रुपचा उद्योग वारसा १९५१ पासूनचा असून दिवंगत तुलसीदास टेकवानी यांनी दुग्ध व्यवसायातून सुरू केलेल्या या प्रवासाने आज सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड, सरस्वती एंटरप्रायझेस, नवनवीन एमजी डीलरशिप्स अशी भरारी घेतली आहे. सध्या समूहाच्या नेतृत्वाची धुरा तिसऱ्या पिढीतील श्री. धवल टेकवानी यांच्या हाती असून, सरस्वती ग्रुपने उद्योग, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श उभारला आहे.

या कार्यक्रमास देववाणी बुगुचिया यांनीही सदिच्छा भेट देऊन आपले विचार व्यक्त केले.

एमजी विंडसर ईव्ही प्रोचा शुभारंभ म्हणजे केवळ एका कारचे अनावरण नाही, तर एक हरित, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज भविष्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे सर्व मान्यवरांनी एकमताने नमूद केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम