जळगावात कोयता व चाकूसह दहशत माजवणारा युवक अटकेत

बातमी शेअर करा...

जळगावात कोयता व चाकूसह दहशत माजवणारा युवक अटकेत

जळगाव, दि. १८ मे (प्रतिनिधी):
शहरातील कोळीपेठ परिसरात कोयता आणि चाकू घेऊन फिरत दहशत पसरवणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई १५ मे रोजी करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा सुभाष ठाकूर (वय २८, रा. आसोदा रोड, जळगाव) असे आहे. तो कोयता व चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र इंधाटे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम