
जळगावात गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई
जळगावात गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई
जळगाव, ता. १८ मे (प्रतिनिधी):
शहरातील वेगवेगळ्या भागांत गांजा सेवन करताना आढळलेल्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, संतोष सोमा हटकर (वय ४५, रा. तांबापुरा) हा मेहरुण बगीचा परिसरात गांजा सेवन करताना एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत सापडला. तर चेतन ललित चौधरी (वय २२, रा. कानळदा रोड) हा तरसोद फाट्याजवळ गांजा ओढताना नशिराबाद पोलिसांच्या निदर्शनास आला.
दोघांविरोधात अनुक्रमे एमआयडीसी व नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे गस्त व कारवाईचे धोरण अधिक तीव्र करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम