
जळगावात गावठी पिस्तूलसह दोन आरोपींना अटक ; एलसीबीची कारवाई
जळगावात गावठी पिस्तूलसह दोन आरोपींना अटक ; एलसीबीची कारवाई
जळगाव: जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹१,२९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या साहित्यात एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईलचा समावेश आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, वरणगाव शहरातील फुलगाव पुलाखाली (ब्रिजखाली) दोन संशयित तरुण गावठी कट्ट्यासह येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, जि. बुरहानपूर, म.प्र.) आणि पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर) अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून गावठी बनावटीचा पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एका काळ्या-लाल रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MP-68 ZC-3357) आणि दोन मोबाईल फोन हस्तगत केले. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. जळगाव यांचे मागर्दशनाखाली उप निरीक्षक सोपान गोरे, पोह, यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे, चापोह भरत पाटील यांनी केली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम