
जळगावात घरफोडी, ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
जळगावात घरफोडी, ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात मनीषकुमार सिंग (वय ३७, रा. देवेंद्रनगर) यांच्या घरात चोरीची घटना उघडकीस आली असून, या घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास झाले. सिंग हे आयकर विभागात कार्यरत असून, ते पत्नी व दोन मुलींसह २० नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी पाटणा (बिहार) गेले होते.
गैरहजेरीत असतानाच अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरी केली. या चोरीत चार ग्रॅम वजनाचे कानातील टोंगल, तीन ग्रॅम वजनाची अंगठी आणि एक ग्रॅम वजनाचे पेंडल असे एकूण ८ ग्रॅम, अंदाजे ४८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले गेले.
२६ नोव्हेंबर रोजी सिंग यांचा मित्र झाडाला पाणी घालण्यासाठी घरास भेट दिली असता दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरीचा प्रकार समोर आला. मित्राने ताबडतोब सिंग यांना याची माहिती दिली. सिंग यांनी ८ डिसेंबर रोजी जळगावात परतल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
सध्या पोहेकॉ जितेंद्र राठोड यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम