
जळगावात चाकू हल्ला; तरुणासह बहिण गंभीर जखमी
जळगावात चाकू हल्ला; तरुणासह बहिण गंभीर जखमी
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव, ;- सम्राट कॉलनीतील महादेव मंदिराजवळ जुन्या वादातून धीरज दत्ता हिरवाडे (वय २५) याच्यावर उदय मोची, कल्पेश चौधरी आणि बबलू धनगर यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.
रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत धीरजची बहिण भांडण सोडवण्यासाठी आली असता, उदय मोचीने तिच्या डोक्यात वीट मारली, ज्यामुळे तीही गंभीर जखमी झाली. आरोपींनी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. संबंधित पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून, तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम