जळगावात चौथ्या मजल्यावरून पडून अधीक्षक अभियंत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बातमी शेअर करा...

जळगावात चौथ्या मजल्यावरून पडून अधीक्षक अभियंत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जळगाव प्रतिनिधी : तापी पाटबंधारे महामंडळात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेले अरुण बाबूराव ढवळे (वय ४०, रा. संभाजी चौक, महाबळ) यांचा गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामानंद नगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संभाजी चौकातील मातोश्री हाईट्समध्ये ढवळे कुटुंबासह वास्तव्यास होते. गुरुवारी सायंकाळी अचानक ते चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. अपार्टमेंटमधील रहिवाशांना ही घटना लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवले; परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

तीन महिन्यांपूर्वीच पदोन्नती मिळाल्यानंतर ढवळे जळगावात बदलीने आले होते आणि मातोश्री हाईट्समध्ये भाडेतत्वावर राहू लागले होते. अचानक घडलेल्या या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम