जळगावात तरुणीवर अत्याचार, आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड

बातमी शेअर करा...

जळगावात तरुणीवर अत्याचार, आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड

जळगाव शहरातील महाबळ परिसरात १४ सप्टेंबर रोजी गणेश साहेबराव पाटील याने १८ वर्षीय तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्यावर अत्याचार केला. त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून तिला सातत्याने धमकावले आणि वारंवार अत्याचार केले. एवढेच नाही, तर त्याने तिला पळवून नेऊन तिचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून बदनामी केली. या कृत्यात त्याचे मित्र विजय, विकास आणि मनोज यांनी साथ दिली.

या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने धाडस करत रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, ३० जुलै २०२५ रोजी रात्री गणेश पाटील आणि त्याच्या तिन्ही मित्रांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम