
जळगावात दाम्पत्याला दोन हॉकर्सकडून मारहाण
जळगावात दाम्पत्याला दोन हॉकर्सकडून मारहाण
जळगाव – फुले मार्केट परिसरात कानटोपी खरेदी करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला दोन हॉकर्सकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण ईश्वर पाटील (वय ४१, रा. साई केमिकल कंपनी, ज्ञानदेवनगर, जुना खेडी रोड) हे पत्नीसमवेत फुले मार्केटमधील रसवंती समोरील स्टॉलवर कानटोपी घेत होते. खरेदीदरम्यान भावावरून विक्रेते अक्षय हिरामण जगताप व कल्पनाबाई हिरामण जगताप यांच्याशी वाद निर्माण झाला. वाद वाढताच दोघांनी पाटील दाम्पत्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर किरण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित हॉकर्सविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम