
जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
जळगाव : सुप्रीम कॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता भरधाव वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (रा. लोंढरी, ता. जामनेर, ह.मु. वाळूज, छ. संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जयपाल नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडताना या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान दुपारी त्याचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम