जळगावात दोन वाहतूक पोलिसांवर कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा...

जळगावात दोन वाहतूक पोलिसांवर कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

 

जळगाव I प्रतिनिधी शहरातील बेंडाळे चौकात शनिवारी (२१ जून) सकाळी १०.३० वाजता एक धक्कादायक घटना घडली. वाहतूक शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ पोलीस कर्मचाऱ्यांना वाद घालून, शासकीय कामात अडथळा निर्माण करत, आरोपींनी लोखंडी कोयता आणि साखळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी हे बेंडाळे चौकात कारवाई करत होते. याच दरम्यान, पाच जणांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. त्यातले एक आरोपीने आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून धारदार लोखंडी कोयता आणि साखळी बाहेर काढून पोलिसांवर धावून येत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

या प्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पुढीलप्रमाणे आहे: अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (६४ वर्ष), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३० वर्ष), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३८ वर्ष), अरुण रामदास टिलोरे (६७ वर्ष) आणि आदिल बेग शरीफ बेग (२७ वर्ष). या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम