जळगावात पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रशिक्षण  संपन्न

बातमी शेअर करा...

जळगावात पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रशिक्षण  संपन्न

जळगाव : जिल्हा पत्रकार संघ, जळगाव आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)” या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि. ४ सप्टेंबर २०२५) रोजी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली.

पत्रकारितेत होत असलेल्या तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर AI तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. वृत्तसंकलन, लेखन, संपादन, छायाचित्र व व्हिडिओ निर्मिती, तसेच माहितीची पडताळणी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कशी सहाय्यभूत ठरते, याचे प्रात्यक्षिक दाखले या कार्यशाळेत सादर करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त श्री विजय पाटील होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे उमाकांत बडगुजर, समन्वयक विनायक कदम यांनी प्रशिक्षण दिले. त्यांनी ChatGPT, टेक्स्ट-टू-इमेज, व्हिडिओ जनरेशन, डेटा विश्लेषण व आवाज ओळख प्रणाली आदी तंत्रज्ञानाची माहिती दिली. AI चे धोके आणि घ्यावयाची खबरदारी यावर सविस्तर माहिती दिली.

श्री डॉ. रवींद्र ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी, श्री. अशोक भाटिया ज्येष्ठ पत्रकार, श्री विवेक खडसे, श्री भिका भाऊ चौधरी , श्री किशोर कुलकर्णी, श्री देवेंद्र पाटील श्री पी आर.पाटील तसेच जिल्ह्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख ज्येष्ठ पत्रकार यांनी केले. कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा ही काळाची गरज असल्याचे मत सहभागी पत्रकारांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम