जळगावात पुन्हा जीवघेणी विद्युत दुर्घटना

बातमी शेअर करा...

जळगावात पुन्हा जीवघेणी विद्युत दुर्घटना
मुख्य वाहिनी तुटून तरुण गंभीर भाजला; तीन दिवसांत दुसरी भीषण घटना, परिसरात दहशत

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सोमवारी (८ डिसेंबर) रात्री अशोक किराणा दुकानाजवळ भीषण विद्युत दुर्घटना घडली. नुकतेच दुरुस्त झालेले काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य वीजवाहिनी अचानक तुटून जमिनीवर कोसळली आणि त्या तारेच्या संपर्कात येताच उमर शेख सलीम (वय २५, रा. दत्तनगर, मेहरुण) हा तरुण गंभीररीत्या भाजला. उपस्थितांनी तत्काळ त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात हलवून उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, याच भागात अवघ्या तीन दिवसांपूर्वी उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा मुख्य वाहिनी तुटून पडल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. सतत होत असलेल्या विद्युत दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महावितरण विभागालाच जबाबदार धरण्यात येत आहे.

स्थानिकांनी तातडीने संपूर्ण परिसराचा सर्वेक्षण करुन जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांची अद्ययावत देखभाल, केबल बदलणे आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, योग्य देखभाल न केल्याने वीजवाहिन्या जीवघेण्या सापळ्यात रूपांतरित होत असून त्वरित उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम