जळगावात बसमध्ये चढतांना वृद्धेच्या गळ्यातून सोनपोत लंपास

शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

जळगावात बसमध्ये चढतांना वृद्धेच्या गळ्यातून चोरट्याने सोनपोत लंपास

शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी
अज्ञात चोरट्याने बसमध्ये चढणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातून सोनपोत तोडून लांबविल्याची घटना शहरातील टॉवर चौकाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलानजीक सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला पोत लंपास केल्यानंतर वृद्ध महिला आणि तिच्या पतीने आरडाओरड केला मात्र चोरटा खासनात रफूचक्कर झाला. याबाबत उशिरा रात्री शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .

यावल तालूक्यातील सांगवी खुर्द येथील मूळ रहिवासी असलेले अल्पभुधारक शेतकरी सदाशिव डिगंबर कोळी (वय-७९) पत्नी जयवंताबाईसह जळगावात आले होते. त्यांनी जखमी असलेल्या आपल्या नातवाची भेट घेवुन त्यांच्या सांगवी या गावाला जाण्यासाठी निघाले होते.

शिवाजीनगर उड्डाणपुला जवळील बसस्टॉपवर बस आल्यानंतर या वृद्ध दाम्पत्यांनी बसमध्ये चढत असतांनाचोरट्याने धक्काबुक्की करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची पोत तोडून पसार झाला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम