
जळगावात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रमाचे नियोजन
जळगावात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रमाचे नियोजन
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा (पूर्व, पश्चिम व महानगर) भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त संघटनात्मक बैठकीचे आयोजन २३ मे २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता भाजप कार्यालय, जी.एम. फाउंडेशन येथे झाले. यावेळी प्रदेश प्रवक्ते व निवडणूक निरीक्षक प्रदीप पेशकार आणि महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणूक आणि संघटनात्मक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. प्रदीप पेशकार यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम प्रभावीपणे साजरा करण्याचे आवाहन केले. जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला असून, कार्यकर्त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे आणि मावळत्या जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांचा प्रदीप पेशकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीला महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महिला आघाडी उपाध्यक्ष रेखाताई वर्मा, महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई सोनवणे, माजी आमदार महेंद्र पाटील, नंदू महाजन, सुरेश धनके, सरचिटणीस махेश जोशी, जितेंद्र मराठे, सचिन पानपाटील, लालचंद पाटील, मधुकर काटे, विशाल त्रिपाठी यांच्यासह मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन नितीन इंगळे यांनी केले, तर राहुल वाघ यांनी आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम