जळगावात भीषण अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

नागरिकांचा रास्ता रोको

बातमी शेअर करा...

जळगावात भीषण अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू नागरिकांचा रास्ता रोको 

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील महामार्गावर बुधवारी (दि. ५ मार्च) रात्री ११ वाजता भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ४५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर उतरून रास्ता रोको केला.

 

मृत विजय नामदेव भोई (वय ४५, रा. आशाबाबा नगर) हे शिव कॉलनी येथे पान टपरी चालवतात. अपघातावेळी ते आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्याचवेळी पाळधीकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांना जबर धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने दुचाकीला काही अंतर ओढत नेले, यात भोई यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको केला. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठी वाहनांची रांग लागली आणि वाहतूक ठप्प झाली.

पोलीस हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत

जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली आणि त्यांना शांत केले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

महामार्गावरील सुरक्षेची मागणी

महामार्गावर वारंवार अपघात होत असून, प्रशासनाकडून योग्य ती सुरक्षा व्यवस्था न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप आणि निराशा आहे. यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम