
जळगावात मेहरूण बगीच्यात तरुणाला दगडाने मारहाण
एमआयडीसी पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल
जळगावात मेहरूण बगीच्यात तरुणाला दगडाने मारहाण
एमआयडीसी पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील मेहरून बगीचा परिसरात मंगळवारी, २५ मार्च रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास एका तरुणावर दोन जणांनी दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी, २६ मार्च रोजी रात्री दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील कुंभारवाडा, मेहरून येथे राहणारा आकाश शांताराम भोई (वय २२) हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो आणि खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी रात्री तो मेहरून बगीचा परिसरात गेला असताना, संशयित आरोपी सोहम ठाकरे आणि विक्रम धनसिंग शिंदे (दोघेही रा. जळगाव) यांनी त्याला कोणतेही ठोस कारण नसताना शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांनी हातातील दगडाने आकाशच्या डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.
या हल्ल्यानंतर आकाश भोई याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी रात्री सोहम ठाकरे आणि विक्रम शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम