
जळगावात युवासेनेचा ‘निष्ठा २०२५’ दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
जळगावात युवासेनेचा ‘निष्ठा २०२५’ दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
जळगाव: शिवसेना प्रणित युवासेनेने आज जळगाव शहरात पारंपरिक उत्साहात ‘निष्ठा २०२५’ ही दहीहंडी साजरी केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, सतरा मजली इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाचे हे तिसरे वर्ष होते.
या कार्यक्रमासाठी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, विशाल वाणी, अमित जगताप, हर्षल मुंडे, अंकित कासार, सौरभ चौधरी, गजेंद्र कोळी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
दहीहंडी उत्सवाला शिवसेनेचे उपनेते गुलाबरावजी वाघ, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, माजी महापौर राखी सोनवणे, माजी नगरसेविका ज्योती तायडे, युवासेना विस्तारक प्रवीण चव्हाण, भूषण मुलाने, सपना चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गोविंदा पथकांनी थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवला. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर आणि जल्लोष करत गोविंदांना प्रोत्साहन दिले. या उत्सवाच्या माध्यमातून युवासेनेने आपली संघटनात्मक ताकद आणि एकी पुन्हा एकदा दाखवून दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम