जळगावात रक्षाबंधन महाउत्सव; महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवल्या राख्या

बातमी शेअर करा...

जळगावात रक्षाबंधन महाउत्सव; महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवल्या राख्या

 

सावदा, ता. रावेर: रक्षाबंधन हा सण केवळ बंधुत्वाचाच नव्हे, तर विश्वास आणि सुरक्षिततेचाही आहे. याच भावनेतून जळगाव जिल्ह्यातील महिलांनी यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्यांची एक अनोखी भेट पाठवून रक्षाबंधन महाउत्सव साजरा केला. महिलांनी आपल्या भावनांची प्रतीक म्हणून या राख्या जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन आणि खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे सुपूर्द केल्या.

राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे प्रेरित होऊन, जिल्ह्यातील प्रत्येक भगिनीने मुख्यमंत्र्यांना ‘रक्षण करणारा भाऊ’ मानून ही खास भेट दिली. या राख्या पाठवताना महिलांनी, ‘मुख्यमंत्री साहेब हे केवळ नेते नाहीत, तर एक रक्षण करणारे भाऊ आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास, सुरक्षितता आणि समान संधी लाभत आहे,’ अशा भावना व्यक्त केल्या.

या खास कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भाले, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष केतकीताई पाटील, जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, उत्तर महाराष्ट्र रक्षाबंधन कार्यक्रम संयोजिका रेखाताई वर्मा, जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण (नवलसिंग पाटील), राजनदादा लासुरकर, उज्वला गोसावी तसेच जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा रक्षाबंधन महाउत्सव राज्यातील सत्ताधाऱ्यांप्रती जनतेच्या भावनिक नात्याचे एक उत्तम उदाहरण ठरला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम