जळगावात श्री दत्तजयंती अखंड नाम-जप यज्ञ सप्ताहाला भक्तांचा उत्साह

बातमी शेअर करा...

जळगावात श्री दत्तजयंती अखंड नाम-जप यज्ञ सप्ताहाला भक्तांचा उत्साह

 औदुंबर प्रदक्षिणेपासून विविध याग-पूजनांपर्यंत दहादिवसीय धार्मिक कार्यक्रमांची नितांत भाविकांसाठी मेजवानी

जळगाव – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित, गुरुकुल कॉलनी (क्राऊन बेकरी मागे, सेंट जोसेफ स्कूल जवळ, एम.जे. कॉलेज रस्ता) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह २०२५ अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात सुरू झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या धार्मिक सप्ताहात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आकर्षक आयोजन करण्यात आले असून श्रद्धाळूंच्या मोठ्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात दिवसभर अध्यात्मिक वातावरण जाणवत आहे.

दररोज पहाटे औदुंबर प्रदक्षिणेने कार्यक्रमांची सुरुवात होते. त्यानंतर अभिषेक, सकाळी ८.०० वाजता भूपाळी आरती, ८.३० वाजता गुरूचरित्र पठण, १०.३० वाजता नैवेद्य आरती असा दिनक्रम सुरू राहतो. संध्याकाळी ६.३० वा. नैवेद्य आरती, त्यानंतर मार्गदर्शन व ध्यान-नित्यसेवा आयोजित केली जाते.

कार्यक्रमानुसार विविध यागांचे आयोजनही विशेष आकर्षण ठरत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम