जळगावात सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह जेरबंद

बातमी शेअर करा...

जळगावात सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, पिंप्राळा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रामानंदनगर पोलिसांनी गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, रामानंदनगर पोलिसांनी पिंप्राळा परिसरात गस्त वाढवली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत महेंद्र उर्फ दादू सपकाळे या सराईत गुन्हेगाराला गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस बाळगताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन रानशेवरे, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबोरे, जितेंद्र राठोर, सुशील चौधरी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेयानंद साळुंके, योगेश बारी, विनोद सूर्यवंशी आणि गोविंदा पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आरोपी महेंद्र सपकाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन रानशेवरे पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम