जळगावात १३ जुलै रोजी १८वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन

बातमी शेअर करा...

जळगावात १३ जुलै रोजी १८वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन

जळगाव | पवन चारिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, मराठा व संस्कृती मंडळ मुंबई आणि युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्वर्गीय मालतीकांत पुरुषोत्तम नारखेडे,  यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १३ जुलै, रविवार रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन हॉल, जळगाव येथे होणार आहे.

संमेलन स्थळी कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे साहित्य नगरी, कैलासवासी प्रा. किसन पाटील सभागृह, अरुण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली व्यासपीठ, कैलासवासी प्रा. कमलाताई पाटील प्रवेशद्वार अशी नामकरणे करण्यात आली आहेत.

या संमेलनाचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलन अध्यक्षस्थानी डॉ. फुला बागुल असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूभाऊ भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजिवकुमार सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, तर निवृत्त डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, लोकमतचे मुख्य संपादक किरण अग्रवाल, निवृत्त प्राचार्य अण्णासाहेब निळकंठ गायकवाड, लेवसंग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रवीण भोळे, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी बहिणाबाई सोपानदेव मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५ हा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

संमेलनात पोस्टर पोएट्री व खानदेशातील कवी-कवयित्रींच्या स्वलिखित कवितांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राजू बाविस्कर यांच्या हस्ते होणार आहे. सूत्रसंचालन व आभार ज्योती राणे करतील.

दुसऱ्या सत्रात परिसंवाद “आणि ती लिहीती झाली” हा अ‍ॅड. विलास मोरे लिखित, सादरकर्त्या प्रा. संध्याताई महाजन आणि मंजुषाताई पाठक असतील. सूत्रसंचालन व आभार विजय लुल्हे करतील.

चौथ्या सत्रात कथाकथन कार्यक्रमात अध्यक्ष रंगकर्मी सहभागी प्रा. दिलीप जाने, प्रा. गोपीचंद धनगर आणि संस्कृती पवनकीर असतील. सूत्रसंचालन व आभार प्रकाश पाटील करतील.

पाचव्या सत्रात “बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवास” या विषयावर अध्यक्ष मायाताई धूप्पड, सहभागी जयश्रीताई काळवीट, सुशीलकुमार शिंदे, रवींद्र शिंदे असतील. सूत्रसंचालन व आभार सुनिता येवले करतील.

कवी संमेलनाच्या सहाव्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक यांच्या अध्यक्षस्थानी प्रा.बी.एन.चौधरी राहणार असून त्यांच्यासोबत सहभागी साहित्यिक प्रा. डॉ. भालेराव, ज्योती राणे, किशोर नेवे, शैलेजा करोडे, हरून पटेल, रमेश धुरंदर, प्रवीण लोहार, आशा साळुंखे, अ‍ॅड. मुकुंद जाधव, डॉ. संजय पाटील, ज्योती वाघ, संतोष साळवे, मंजुषा पाठक, संध्या भोळे, शीतल पाटील, मनोहर तेजवानी, प्रकाश पाटील, प्रफुल्ल पाटील, भीमराव सोनवणे, डीडी पाटील, जयश्री काळवीट, सुनीता येवले, गंगा सपकाळे, निंबा बडगुजर, विजय लुल्ले, इंदिरा जाधव, चित्रा पगारे, शहानूर तडवी आदी कवी सहभागी होणार आहेत.

संमेलनाचा समारोप प्रा. संध्या महाजन यांच्या कवितेसह होणार आहे. समारोप सत्रात अध्यक्ष श्रीमती पौर्णिमा ताई हुंडीवाले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व कवींच्या सहभागाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

या संमेलनासाठी लक्ष्मीकांत महाजन, प्रतिभा खडके, छोटू खडके, शब्बीर सय्यद, राम महाजन, चंद्रकांत पाटील, संतोष पाटील, हरीश सोनार, प्रा. विजय नारखेडे, राजेश वाणी, हिरालाल चौधरी, अ‍ॅड. सलीम शेख, दिनेश चौधरी, सुधाकर सबके, सचिन भोळे, डॉ. प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, राहुल खडके, संतोष सोनार, सिंहा चौधरी, हितेश नारखेडे, गोविंदा भोळे, पद्माकर चौधरी, पवन नारखेडे, दुर्गादास कोल्हे, शंकर चव्हाण, आयुष नारखेडे, जगदीश नेते, रवींद्र खडके, मनोज पाटील, महेंद्र पाटील, कुमुद नारखेडे, लोकेश राणे यांचे सहकार्य लाभत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम