जळगावात ३०० बांबु झाडांची लागवड

बातमी शेअर करा...
जळगावात ३०० बांबु झाडांची लागवड
जळगाव प्रतिनिधी  जळगाव शहरातील प्रभाग नंबर ७ रेल्वे लाईन लगत जाग़ुत श्री महादेव, मारुती, गणपती व गजानन महाराज मंदिरातर्फे, महानगरपालिका आणि ग़ीन सिटी फाउंडेशन तर्फे ३०० बांबू झाडांची लागवड आज रोजी सकाळी करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर अश्विन सोनवणे , मान्यवर, जाग़ुत मंदीराचे ट़स्ट चे अध्यक्ष महेंद्र मुंदडा, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव सुमित्रा पाटील, नरेंद्र चौधरी, शेखर चौधरी, महाले बंधु, सर्व पदाधिकारी , जळगाव महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे इंजिनीयर प्रकाश पाटील, वसंत पाटील, ग़ीन सिटी फाउंडेशन चे विजय वाणी, चंद्रशेखर नेवे, गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी मदन लाठी, मिशन ग्रीनरीचे अजिंक्य तोतला, विशाल पाटील, राकेचा, एस डी फाउंडेशन चे दुसाने, रफिक भाई पिंजारी, संतोष क्षिरसागर, किशोर पांडे, धनंजय बेंद्रे, राजु वाणी, नारीशक्ती च्या मनिषा पाटील एडव्होकेट पी पी पाटील, स्वप्नील बिर्ला, मनीष बाहेती, ज्ञानदेव नारखेडे आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
जळगाव शहराचे येणाऱ्या काळात तापमान कसे कमीत कमी होईल यासाठी युद्ध पातळीवर महानगरपालिका, शहरातील सर्व सेवाभावी संस्था, एन जी ओ आणि पर्यावरण दूत, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक वनीकरण विभाग आदी सर्व प्रयत्न करीत आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम