जळगावात ४० वी एम-सेट परीक्षा रविवारी; २९३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे

बातमी शेअर करा...

जळगावात ४० वी एम-सेट परीक्षा रविवारी; २९३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे

जळगाव ( प्रतिनिधी) : ४०व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एम-सेट) परीक्षेचे आयोजन येत्या रविवारी, १५ जून रोजी जळगाव येथील सात परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे. ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील खालील केंद्रांवर परीक्षा होणार आहे –

स्वामी विवेकानंद भवन ‘अ’ (केंद्र क्रमांक १४०१)

स्वामी विवेकानंद भवन ‘ब’ (१४०२)

स्वामी विवेकानंद भवन ‘क’ (१४०३)

शिक्षणशास्त्र महाविद्यालय (१४०४)

ए.टी. झांबरे माध्यमिक महाविद्यालय (१४०५)

आयएमआर व्यवस्थापन व संशोधन संस्था (१४०६)

अभियांत्रिकी महाविद्यालय (१४०७)

या परीक्षेसाठी एकूण २९३६ विद्यार्थी विविध विषयांसाठी प्रविष्ट झाले असून परीक्षेच्या तयारीसाठी सर्व केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सेट परीक्षेचे संपर्क अधिकारी तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम