जळगावात ५५१ शिक्षकांचा गौरव; ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा’ संपन्न

बातमी शेअर करा...

जळगावात ५५१ शिक्षकांचा गौरव; ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा’ संपन्न

जळगाव: शिक्षक म्हणजे राष्ट्राच्या भविष्याचा पाया आणि समाजाला दिशा देणारा ज्ञानदाता. याच भूमिकेतून गुरुजनांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, सतखेडा यांनी जळगावात प्रथमच भव्य ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा’ आयोजित केला. या सोहळ्यात तब्बल ५५१ शिक्षकांचा गौरव ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान’ पुरस्कार देऊन करण्यात आला.

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त, समाजसेवक आणि माजी नगरसेवक डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी हा गौरव सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते आणि अधिकारी उपस्थित होते, ज्यात कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि अ‍ॅड. उज्ज्वल निकम, आमदार सत्यजित तांबे आणि राजूमामा भोळे यांचा समावेश होता.

यासोबतच, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जळगाव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, देवी शारदा आणि भारत मातेच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाली. सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील आणि डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या पुढाकाराने हा अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला होता.

डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी या सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. “गुरूंचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा आदर राखणे आणि त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक नोंद घेणे, हीच समाजाची खरी प्रगती आहे,” असे ते म्हणाले.

सर्व उपस्थित मान्यवरांनी या अभूतपूर्व आणि दिमाखदार सोहळ्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अमोल भट यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, आणि त्यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम