जळगावात ६० हजार रुपये किमतीच्या एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक, एक आरोपी पसार

बातमी शेअर करा...

जळगावात ६० हजार रुपये किमतीच्या एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक, एक आरोपी पसार

जळगाव (प्रतिनिधी): तांबापुरा परिसरातील जेके पार्क नजीक अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या महमूद हनीफ पटेल (३५, रा. मास्टर कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आणि मोबाईल असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, त्याचा साथीदार अरमान चिंधा पटेल मात्र पोलिसांना चकवा देऊन पसार झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना जेके पार्क परिसरात अमली पदार्थ विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने स्विमिंग टँकजवळ सापळा रचला. यावेळी महमूद पटेलला ताब्यात घेऊन झडती घेतली असता ६० हजार रुपये किमतीचे ड्रग्ज सापडले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम