
जळगाव आर टी ओ कार्यालयात रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन
चार चाकी वाहन धारकाने सिट बेल्ट लावणे आवश्यक
जळगाव आर टी ओ कार्यालयात रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन
चार चाकी वाहन धारकाने सिट बेल्ट लावणे आवश्यक
जळगाव (प्रतिनिधी )
जळगाव येथील आर टी ओ कार्यालयात दि. 12 रोजी नेहमीप्रमाणे रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन संपन्न
जळगाव आर टी ओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक गणेश वसंत पाटील यांनी वाहतूक सुरक्षा संबंधी माहिती दिली त्यात मुख्य सिग्नल लाल, पिवळा, हिरवा काय संबोधित करत हे सविस्तर सांगितले
चार चाकी वाहन धारकाने सिट बेल्ट का आवश्यक ते सांगितले. रस्त्याने पायी चालतांना कुठल्या बाजूने घालावयाचे त्याची माहिती दिली. जर रस्त्यावर कुठलाही अपघात झालेला दिसला तर पेशंटला दवाखान्यात लवकरात लवकर कसा पोहचु शकेल याचा प्रयत्न करावा.
या वेळी गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन लाठी यांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपला पुण्याचा परिवारातील हेल्मेटचा २०१६ चा अनुभवलेला अनुभव सांगितले. हेल्मेट बाईक स्वार कशे सुरक्षीत राहीले. या अनुभवाबद्दल तत्कालीन परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले होते आणि तो अनुभव आणि हेल्मेट वापरणे का आवश्यक आहे हे तळापर्यंत म्हणजे जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी त्या वेळी पुण्यात आणि जळगावात जनजागृती व़ुत्तपत्रांमार्फत केली होती.
दुचाकी चालवितांना हायवेवर घ्यावयाची काळजी, दुचाकीला दोन आरसे आवश्यक असुन हायवेवर घालविता एका/डाव्या बाजुने अशे विविध नियमांची माहिती दिली जेणेकरुन दुचाकी स्वार कसं सुरक्षित राहू शकेल हे ही सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम