जळगाव: घरफोडी करणारा सराईत आरोपी गजाआड

१२.५० लाखांचे दागिने जप्त; रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा...

जळगाव: घरफोडी करणारा सराईत आरोपी गजाआड

१२.५० लाखांचे दागिने जप्त; रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव प्रतिनिधी

शहरातील रामानंद नगर परिसरात झालेल्या मोठ्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक करून १२.५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून १५९.९२ ग्रॅम सोने आणि ४५० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, पोलिसांनी गुन्ह्याचा छडा सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने लावला.

घरफोडीची घटना आणि पोलिसांची तपासमोहीम

फिर्यादी पराग जगन्नाथ चौधरी (वय ४८, व्यवसायिक, रा. रामानंद नगर, जळगाव) यांच्या बंद घरात ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ ते ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून प्रवेश केला.कपाट आणि डब्यांमधून २२ तोळे सोने, ४५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १६,५०० रुपये रोख रक्कम चोरीला गेली.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांचा वापर करून तपास सुरू केला.

आरोपीचा शोध आणि अटक

तपासादरम्यान एका मोपेडस्वार व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीत आढळल्या.टोलनाक्यांचे फुटेज तपासल्यानंतर आरोपी पारोळा टोलनाक्यावर दिसून आला.त्याच्या हालचालींवरून तो धुळे, अमळनेर आणि पारोळा परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांनी साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल शेख खलील शेख (वय २०, रा. पश्चिम हुडको, चाळीसगाव रोड, पवन नगर, धुळे) याला ताब्यात घेतले.

चोरीचा कबुलीजबाब आणि हस्तगत मुद्देमाल

अटकेनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेले सोने साथीदारांच्या मदतीने वितळवल्याचे सांगितले. त्याच्या घरातून चोरीस गेलेले चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.पोलिसांनी या गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांनाही अटक केली आहे.

अटक आरोपींची नावे

पवनराज संजय चौधरी (वय २८, रा. हत्ती गल्ली, पारोळा)
सागर वाल्मीक चौधरी (वय ३०, रा. आझाद चौक, पारोळा)
केशव बाळू सोनार (वय ३६, रा. शाहू नगर, अमळनेर)

आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल

साहिल शेख याच्या विरोधात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे (ता. मालेगाव, जि. नाशिक) आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाणे (धुळे) येथे जबरी चोरी, घरफोडी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांचे सहकार्य आणि पुढील तपास

या कारवाईचे नेतृत्व रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, हवालदार जितेंद्र राजपूत, इरफान मलिक, सुशील चौधरी, प्रवीण भोसले, नाईक देवानंद साळुखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी आणि प्रवीण सुरवाडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे!

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम