जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकता संघटनेचे तीव्र आंदोलन

वक्फ सुधारणा विधेयक परत घेण्याची मागणी

बातमी शेअर करा...

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकता संघटनेचे तीव्र आंदोलन
वक्फ सुधारणा विधेयक परत घेण्याची मागणी

जळगाव, प्रतिनिधी:

केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 विरोधात एकता संघटनेच्या वतीने १७ मार्च रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि “धर्मनिरपेक्ष” राजकीय पक्षांना जागृत करण्यासाठी घोषणाबाजी करत विधेयकाचा तीव्र विरोध करण्यात आला.

विधेयक मुस्लिम समुदायाच्या हक्कांवर हल्ला – फारूक शेख
संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी निदर्शकांशी संवाद साधताना सांगितले की,
“हे विधेयक वक्फ मालमत्तांवरील हक्क कमी करण्याचा प्रयत्न असून, मुस्लिम समाजावर थेट हल्ला आहे.”

“लोकशाहीत कोणताही कायदा तयार करताना संबंधित समुदायांशी चर्चा केली जाते. मात्र, या विधेयकाच्या बाबतीत सरकारने हुकूमशाही भूमिका घेतली आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

संघटनेने एनडीएच्या सहयोगी पक्षांवरही टीका करत म्हटले की,
“जे पक्ष मुस्लिम मतांसाठी प्रयत्न करतात, ते भाजपच्या सांप्रदायिक अजेंड्याचे समर्थन करत आहेत.”

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “वक्फ विधेयक परत घ्या!”, “लोकशाहीत हुकूमशाही चालणार नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, आणि अल्पसंख्यांक मंत्री यांना हे विधेयक संसदेत पारित करू नये, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात मुफ्ती अतिक उर रहमान, मौलाना रहीम पटेल, मौलाना तोफिक शाह, फारूक शेख, अनिस मणियार, महमूद सर, मोहम्मद इरफान आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम