जळगाव जिल्हा ग्राम महसूल अधिकारी तलाठी संघटनेच्या वतीने गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा...

जळगाव जिल्हा ग्राम महसूल अधिकारी तलाठी संघटनेच्या वतीने गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी I नुकताच जळगाव जिल्हा ग्राम महसुल अधिकारी संघटना व जलगाव जिल्हा तलाठी मंडळ अधिकारी पतपेढी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गुणगौरव गुणवंत पाल्य सत्कार सोहळा संपन्न झाला .

जळगाव जिल्हा ग्रामसभा अधिकारी यांच्या वतीने दि 14/9/2025 रोजी तलाठी भवन जळगाव येथे गुणवंत पाल्य सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हाधिकारी माननीय आयुष्य प्रसाद साहेब हे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष आर डी पाटील,सचिव निशिकांत माने, जळगाव जिल्हा तलाठी पतपेढीचे चेअरमन राजेश भंगाळे व सर्व संचालक मंडळ तसेच जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .

यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी उपस्थितांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले तसेच शैक्षणिक गुणवत्तेसोबतच इतर विविध क्षेत्रात खेळ संगीत कला इत्यादी क्षेत्रात सुद्धा आपापल्या पाल्यांना शिक्षण कसे देता येईल याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पतपेढीच्या वाटचालीस हार्दिक शुभकामना दिल्या यावेळी जिल्हाभरातून संघटना व पतपेढीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणगौरव सोहळ्यानंतर पतपेढीची विसावी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन महोदय यांनी वार्षिक अहवाल वाचन करून संबंधितांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा तलाठी मंडळ अधिकारी पतपेढीचे संचालक सचिव श्री रुपेश ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक यासीन तडवी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी आनंद इंगळे व जगदीश बिराडे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम