जळगाव जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय फेडरेशन कपसाठी निवड

बातमी शेअर करा...

जळगाव जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय फेडरेशन कपसाठी निवड

जळगाव  प्रतिनिधी जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ कुशल खेळाडूंनी राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय तायक्वांडो फेडरेशन कप तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायक्वांडो कप जानेवारी २०२६ या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे .

नाशिक येथे ७ डिसेंबर २०२५ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान नाशिक येथिल क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ओपन तायक्वांडो स्पर्धेत 7 पदके पटकावत जळगावच्या खेळाडूंनी आपली दमदार कामगिरी सिद्ध केली.

या स्पर्धेत यश मिळवणारे खेळाडू असे—

१)कौस्तुभ जंजाळे – रौप्य पदक
२)श्वेता कोळी – रौप्य पदक
३)मोहीनी राऊत – रौप्य पदक
४)आराध्य परदेशी – कांस्य पदक
५)भूमिका मालपाणी – कांस्य पदक
६)जाह्नवी शिंपी – कांस्य पदक
७)सार्थक साळुंखे – कांस्य पदक
८)विधी दवंडे – उत्कृष्ठ सहभाग

राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून या सातही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली असून जळगाव जिल्ह्यात त्यांच्या यशाचा मोठा गौरव होत आहे.

या खेळाडूंना जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव राजेंद्र जंजाळे आणि भूषण मगरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. या उल्लेखनीय यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल, उपाध्यक्ष हरीभाऊ राऊत, सचिव राजेंद्र जंजाळे, सहसचिव श्रीकृष्ण चौधरी, कोषाध्यक्षा प्रेमलता जोनवाल,कार्यकारी मंडळाचे सभासद चंद्रकांत सपकाळे,रुपेश डोळे,धीरज जावळे, ऋषिकेश पाटील, सुनील मोरे यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करीत पुढील वाटचाली साठीशुभेच्छ दिल्यात

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम