
जळगाव जिल्हा परिषदेची ऐतिहासिक कामगिरी – अवघ्या पाच महिन्यांत २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ
जळगाव जिल्हा परिषदेची ऐतिहासिक कामगिरी – अवघ्या पाच महिन्यांत २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच पदोन्नती प्रक्रियेत विक्रमी वेग दाखवत केवळ पाच महिन्यांत तब्बल २०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी मार्च २०२५ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर अत्यंत पारदर्शक व न्याय्य पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली.
विशेष म्हणजे, पदोन्नतीसंदर्भातील सर्व बैठकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून, हे पाऊल जिल्हा परिषदेच्या इतिहासात एक अभिनव आणि आदर्श ठरले आहे. समुपदेशन पद्धतीचा अवलंब करून पारदर्शकता राखल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
विभागनिहाय पदोन्नती लाभार्थी संख्या:
-
बांधकाम विभाग – ११
-
ग्रामपंचायत विभाग – ११
-
कृषी विभाग – ५
-
आरोग्य विभाग – ६३
-
पशुसंवर्धन विभाग – ७
-
अर्थ विभाग – १४
-
सामान्य प्रशासन विभाग – ३
-
शिक्षण विभाग – ९३
पदोन्नती मिळालेली पदे:
या प्रक्रियेत कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, सेविका, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामपंचायत व कृषी विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, तसेच लेखा विभागातील सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती प्रक्रिया अवघ्या काही महिन्यांत पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम