
जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न
जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा आयोजित
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंची निवड
जळगाव – नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन द्वारा सहावी नॅशनल योगासन स्पोर्टस चॅम्पियनशिप येत्या काही काळात आयोजित होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन संघाची निवड हि राज्य योगासन स्पर्धेतून केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या जळगाव जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून राज्य संघात निवड होणे गरजेचे आहे. त्या हेतूने जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा दि. २७ जुलै २०२५ रविवार रोजी सोहम योग विभाग मू. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धा सब ज्युनियर गट वय वर्ष १० ते १४, ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ आणि सीनियर गट वय वर्ष १८ ते २८ मुल व मुली तसेच या वर्षी नवीन समाविष्ट झालेले नवीन गट म्हणजे सिनिअर ‘अ ’गट २८ ते ३५ सिनिअर ‘ब’ गट ३५ ते ४५ आणि सिनिअर ‘ क’ गटात ४५ ते ५५ महिला व पुरुष अशा एकूण सहा गटांमध्ये अशी वेगवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा शुभारंभ दि. २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ओंकार साधना व प्रार्थनेने करण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला अध्यक्षपदी के,सी ई सोसायटी चे सचिव अॅड. श्री. प्रमोद पाटील, माजी कुलगुरू आणि के. सी. ई. सोसायटी च्या शैक्षणिक समन्वयिका डॉ. मृणालिनी फडणवीस, मू. जे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर , सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार हे उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपिठावर अध्यक्षपदी के. सी. ई. सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. संजय प्रभुदेसाई उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद उपस्थित होते. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. देवानंद सोनार, जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव प्रा. पंकज खाजबागे उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थित स्पर्धक, पालक आणि प्रशिक्षकांना योग आणि योगासन स्पर्धांचे आधुनिक युगातील महत्व पटवून दिले. स्पर्धेतील खेळाडूंना भविष्यात उपलब्ध संधीविषयी यावेळी माहिती देण्यात आली. सदर स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याना यावेळी प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी तांत्रिक समितीमध्ये प्रा. ज्योती वाघ, डॉ.शरयू विसपुते ,प्रा. श्रद्धा व्यास ,राहुल खरात, शुभम पाटील, साहिल तडवी, प्रकाश राठोड, स्वप्नाली महाले, मानसी मेढे, तनवीर तडवी, कल्याणी पाटील यांनी कार्यभार सांभाळला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे सचिव प्रा. पंकज खाजबागे, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा. रणजीत पाटील, डॉ. प्रिती पाटील, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि आजी माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज खाजबागे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. देवानंद सोनार यांनी व्यक्ते केले. शांतीपाठ करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
राजस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली गटानुसार स्पर्धक :-
ट्रॅडिशनल इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनियर मुली (१० ते १४ वयोगट):- विधी गौरव किनगे
सब ज्युनियर मुले (१० ते १४ वयोगट):- स्पर्श जितेंद्र विसपुते
ज्युनियर मुली (१४ ते १८ वयोगट):- प्रज्वल रमेश भामरे
ज्युनियर मुले (१४ ते १८ वयोगट):- कृष्णा ईश्वर सोनार
सिनियर मुली (१८ ते २८ वयोगट):- दिपाली सुनील महाले
सिनियर मुले (१८ ते २८ वयोगट):- देवेंद्र हरिचंद्र कोळी
सिनियर A महिला (२८ ते ३५ वयोगट):- किरण श्यामलाल लुल्ला
सिनियर A पुरुष (२८ ते ३५ वयोगट):- जगदीशकुमार कुंदनदास वैष्णव
सिनियर B महिला (३५ ते ४५ वयोगट):- बबिता जितेंद्र पाटील
सिनियर B पुरुष (३५ ते ४५ वयोगट):- हर्ष अशोक लोकचंदानी
सिनियर C महिला (४५ ते ५५ वयोगट):- वैशाली अरुण वोडेकर
सिनियर C पुरुष (४५ ते ५५ वयोगट):- सुनील आत्माराम महाले
फॉरवर्ड बेंड इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– अन्वी राहुल कोटेचा
सब ज्युनिअर मुले (10 ते 14 वर्षे):– भावेश प्रविण वाणी
ज्युनिअर मुले (14 ते 18 वर्षे):– कृष्णा ईश्वर सोनार
सिनिअर मुली (18 ते 28 वर्षे):– जान्हवी दीपक सोमन
सिनिअर मुले (18 ते 28 वर्षे):– सचिन किशोर जोहरे
सिनिअर A महिला (28 ते 35 वर्षे):– चंचल सूर्यकांत माळी
सिनिअर B महिला (35 ते 45 वर्षे):– डॉ. शरयू जितेंद्र विसपुते
सिनिअर C महिला (45 ते 55 वर्षे):– मोना जितेंद्र गांधी
सिनिअर A पुरुष (28 ते 35 वर्षे):– जगदीशकुमार कुंदनदास वैष्णव
बॅक बेंड इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– ध्रुवी धीरज बडाले
सब ज्युनिअर मुले (10 ते 14 वर्षे):– सान्वी सुयश बुरकुल
सिनिअर मुले (18 ते 28 वर्षे):– अशुतोष संतोष भोई
स्टिंग इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– हिरल रविंद्र बारी
सब ज्युनिअर मुले (10 ते 14 वर्षे):– स्पर्श जितेंद्र विसपुते
ज्युनिअर मुली (14 ते 18 वर्षे):– यशश्री प्रदीप नांद्रे
सिनिअर मुली (18 ते 28 वर्षे):– भाग्यश्री राजेंद्र तोडकर
सुपाईन इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– अन्वी राहुल कोटेचा
सिनिअर A महिला (28 ते 35 वर्षे):– चंचल सूर्यकांत माळी
हॅंड बॅलन्स इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– हर्षाली प्रशांत विरकर
ज्युनिअर मुले (14 ते 18 वर्षे):– मानराज योगराज चौधरी
सिनिअर मुली (18 ते 28 वर्षे):– दीपाली सुनील महाले
सिनिअर मुले (18 ते 28 वर्षे):– शाहीदखान इक्बालखान पठाण
लेग बॅलन्स इंडिव्हिज्युअल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– ऐश्वर्या सतीश खडके
सिनिअर मुली (18 ते 28 वर्षे):– नयना नरेंद्र वाघ
कलात्मक एकल योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– सान्वी सुयश बुरकुल
सिनिअर मुले (18 ते 28 वर्षे):– मानराज योगराज चौधरी
कलात्मक जोडी योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांची नावे:
सब ज्युनिअर मुली (10 ते 14 वर्षे):– हर्षाली प्रशांत वीरकर आणि ऐश्वर्या सतीश खडके

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम