
जळगाव जिल्ह्यातील १० पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
उत्कृष्ट सेवेसाठी गौरव
जळगाव जिल्ह्यातील १० पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
उत्कृष्ट सेवेसाठी गौरव
प्रतिनिधी | जळगाव
पोलीस प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना देण्यात येणाऱ्या ‘महासंचालक सन्मानचिन्हा’साठी जळगाव जिल्ह्यातील १० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
या सन्मानचिन्हाची घोषणा राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी केली. सन २०२४ च्या महासंचालक सन्मानचिन्ह पदक यादीत जळगाव जिल्ह्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह आठ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. पोलिस दलात उत्कृष्ट सेवा आणि प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. राष्ट्रपतींच्या पोलीस पदक व शौर्यपदकांनंतर हे एक मानाचे पदक मानले जाते.
जिल्ह्यातून यांचा समावेश
जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक शामकांत पाटील, जग्गनाथ पाटील, पोलिस हवालदार रमेश शंकर कुमावत, हरिश मधुकर कोळी, स्थानिक गुन्हे शाखेतील जितेंद्र राजाराम पाटील, गोरखनाथ रामभाऊ बागुल, विनोद बळीराम पाटील, दिलीप लक्ष्मीकांत कुलकर्णी, आशिष प्रतापराव चौधरी व पोलिस शिपाई जागृती चंद्रशेखर काळे यांचा समावेश आहे.
या सर्व अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातून विविध स्तरांवर अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या सेवेचा हा गौरव पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा प्रत्यय देणारा आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम