
जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका व बाजरी खरेदीस प्रारंभ
शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी आवाहन, हमीभावाने खरेदी सुरू
जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका व बाजरी खरेदीस प्रारंभ
शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी आवाहन, हमीभावाने खरेदी सुरू
जळगाव प्रतिनिधी – रब्बी हंगाम २०२३-२४ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका व बाजरी खरेदीस प्रारंभ झाला आहे. नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून हमीभावाने ही खरेदी केली जात असून, शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव या १६ तालुक्यांमध्ये हरभऱ्याच्या खरेदीसाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर पाळधी येथे ज्वारी, मका आणि बाजरीच्या खरेदीसाठी स्वतंत्र केंद्र कार्यरत आहे.
हमीभाव व खरेदी कालावधी:
हरभरा
हमीभाव: ₹5650 प्रति क्विंटल
नोंदणी कालावधी: 27 मार्च ते 25 एप्रिल 2025
खरेदी कालावधी: 01 एप्रिल ते 29 जून 2025
ज्वारी
हमीभाव: ₹3371 प्रति क्विंटल
मका
हमीभाव: ₹2225 प्रति क्विंटल
बाजरी
हमीभाव: ₹2625 प्रति क्विंटल
नोंदणी कालावधी: 02 एप्रिल ते 30 एप्रिल 2025
खरेदी कालावधी: 01 मे ते 30 जून 2025
शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाईन पोकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८अ चे कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय संचालक संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार, तसेच जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेणे यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम