जळगाव जिल्ह्यात ४.१० लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ

वितरणासाठी ३१ मेपर्यंतची तयारी

बातमी शेअर करा...

जळगाव जिल्ह्यात ४.१० लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ

वितरणासाठी ३१ मेपर्यंतची तयारी

जळगाव (प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४ लाख १० हजार ९१८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जात असून, ३१ मेपर्यंत वितरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने ‘बालभारती’कडे पुस्तकांची मागणी सादर केली असून, इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ५६,८९८ मराठी पुस्तक संचांची तर २,४२८ इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या संचांची मागणी करण्यात आली आहे.

तालुकानिहाय विद्यार्थ्यांची संख्या:

अमळनेर : २७,३९७ , भडगाव : १८,०२६ , भुसावळ : २७,८६४ , बोदवड : ९,७५४ , चाळीसगाव : ५४,२१६ , चोपडा : ३८,८८४ , धरणगाव : १०,२५९ , एरंडोल : १८,२५० , जळगाव : २४,४०० , जामनेर : ४३,००० , मुक्ताईनगर : १०,४८५ , यावल : २०,९०२ , रावेर : ३१,९८५ , पारोळा : २२,९५५

बालभारती पुणे येथून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा प्रथम जिल्हास्तरावर केला जाणार आहे. त्यानंतर तालुका आणि शाळा केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचवली जातील.
प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत यासाठी विभागाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम