जळगाव तालुका कापूस उत्पादक सहकारी संस्थाच्या चेअरमनपदी निलेश चव्हाण

व्हाईस चेअरमनपदी युवराज सपकाळे यांची निवड

बातमी शेअर करा...

जळगाव तालुका कापूस उत्पादक सहकारी संस्थाच्या चेअरमनपदी निलेश चव्हाण

व्हाईस चेअरमनपदी युवराज सपकाळे यांची निवड

जळगाव प्रतिनिधी

कानळदा येथील जळगाव तालुका कापूस उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी निलेश भुजंगराव चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी युवराज भिला सपकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव तालुका कापूस उत्पादक सहकारी संस्था कानळदा ता.जि.जळगाव या संस्थेच्या अकरा कार्यकारी संचालकपदासाठीची निवडणूक नुकतीच पारपडली या ‍ निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार निवडूण आले.‍ नवनिर्वाचित कार्यकारी संचालकांच्या सभेत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी निवडणूक घेण्यात आली.चेअरमनपदी ‍ निलेश भुजंगराव चव्हाण व व्हाईस चेअरमनपदी युवराज भिला सपकाळे यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली. सभेत सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. त्यांच्या निवडी बद्दल पंचायत समिती जळगावचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ चव्हाण, ग्रामिण शिक्षण संस्थेचे संचालक प्रविण भोळे, हरिचंद्र देशमुख, प्रकाश सपकाळे, शरद भंगाळे आदीनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.पी.भारंबे यांनी काम पाहिले. त्यांना सचिव दिनेश चव्हाण यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम