जळगाव तालुक्यात महावितरणच्या ५० हजारांचे अल्युमिनियम तार चोरी

बातमी शेअर करा...

जळगाव तालुक्यात महावितरणच्या ५० हजारांचे अल्युमिनियम तार चोरी

जळगाव : तालुक्यातील सावखेडा शिवारात महावितरण कंपनीच्या मालकीचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे. ही चोरी २५ ते २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री दरम्यान झाली असून, शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीकडून जळगाव तालुक्यात उच्च दाब वहिनीचे काम सुरू होते. या कामासाठी लागणारे अल्युमिनियमचे तार सावखेडा शिवारातील गट क्रमांक १४७ आणि १४८ या शेतांमध्ये ठेवण्यात आले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी थेट शेतात ठेवलेल्या तारांवर डल्ला मारून चोरी केली.

शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही चोरी आली. त्यानंतर कनिष्ठ अभियंता रोहन पाटील यांनी तातडीने तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत बदर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम