जळगाव नगर भूमापन कार्यालयातील शिरस्तेदार भगवान पाटील यांची नंदुरबारला बदली

बातमी शेअर करा...

जळगाव नगर भूमापन कार्यालयातील शिरस्तेदार भगवान पाटील यांची नंदुरबारला बदली

 

जळगाव: जळगाव नगर भूमापन कार्यालयात शिरस्तेदार (सर्वसाधारण-२) पदावर कार्यरत असलेले श्री भगवान साहेबराव पाटील यांची नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बदली झाली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली असून, नाशिक भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाने १ ऑगस्ट २०२५ रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे.

बदलीच्या आदेशानुसार, श्री पाटील यांना १ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव कार्यालयातून नगर भूमापन अधिकारी वसंत सोनवणे यांनी कार्यमुक्त केले आहे.

श्री भगवान पाटील यांच्याकडील शिरस्तेदार (सर्वसाधारण-२) या पदाचा अतिरिक्त कार्यभार जळगाव नगर भूमापन कार्यालयातील पररीक्षण भूमापक शहर क्र. १, कृष्ण जनार्दन भट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते हे दोन्ही पदभार सांभाळतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम