जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सुनील महाजन विराजमान ; लकी अण्णा टेलर यांचा पराभव

बातमी शेअर करा...

जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सुनील महाजन विराजमान ; लकी अण्णा टेलर यांचा पराभव

उपसभापतीपदी गोकुळ चव्हाण

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी १५ विरुद्ध २ मतांनी विजय मिळवत बाजी मारली. त्यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी उभे राहिलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांना  पराभवाचा पत्करावा लागला .

माजी सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करत राजकीय वातावरण तापवले होते. त्यानंतर प्रस्तावाला सामोरे जाण्याआधीच सोनवणे यांनी राजीनामा दिला आणि रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज विशेष सभेचे आयोजन झाले.

या निवडणुकीत सभापतीपदासाठी सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी व लक्ष्मण पाटील हे उमेदवार होते. मात्र मनोज चौधरी यांनी माघार घेतल्याने लढत महाजन विरुद्ध पाटील अशी रंगली. मतदानात महाजन यांना तब्बल १५ मते, तर पाटील यांना फक्त २ मते मिळाली.

दरम्यान, उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. निकाल जाहीर होताच महाजन यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. दुसरीकडे, पराभवामुळे ‘लकी टेलर’ म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मण पाटील यांना पुन्हा एकदा सभापतीपद हुकल्याची हुलकावणी मिळाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम