जळगाव-भुसावळ मार्गे थेट तिरुपती-हिसार विशेष ट्रेन सुरु; जाणून घ्या वेळापत्रक, थांबे आणि सुविधा

बातमी शेअर करा...

जळगाव-भुसावळ मार्गे थेट तिरुपती-हिसार विशेष ट्रेन सुरु; जाणून घ्या वेळापत्रक, थांबे आणि सुविधा

जळगाव प्रतिनिधी l तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक तिरुपतीत बालाजीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, खानदेशातील भाविकांना थेट तिरुपतीला जाण्यासाठी थोडी अडचण जाणवत होती. ही गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

 

रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान गाडी क्रमांक ०७७१७ ही साप्ताहिक विशेष ट्रेन सुरु केली आहे. ही गाडी बुधवारी रात्री ११.४५ वाजता तिरुपतीहून सुटून शनिवारी दुपारी २.०५ वाजता हिसारला पोहोचेल.

तसेच, गाडी क्रमांक ०७७१८ ही ट्रेन १३ जुलै ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान रविवारी रात्री ११.१५ वाजता हिसारहून सुटून बुधवारी सकाळी ११.३० वाजता तिरुपतीला पोहोचेल.

महत्त्वाचे थांबे – जळगाव आणि भुसावळकरांसाठी दिलासादायक

या विशेष ट्रेनला रेनिगुंटा, कड्डूपा, गुत्ती, कुर्नूल, महबूबनगर, काचीगुडा, निजामाबाद, नांदेड, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, वडोदरा, अजमेर, सीकर, झुंझुनू, लोहारू, सादुलपूर आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मिळणार आहे. त्यामुळे जळगाव, भुसावळ परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२२ डब्यांची सोय – आरामदायी प्रवासाची हमी

ही विशेष ट्रेन २२ डब्यांची असणार असून, स्लीपर, जनरल आणि एसी कोचेसचा समावेश असेल. त्यामुळे दक्षिण भारतातील तिरुपती ते उत्तर भारतातील हिसार हा दीर्घ प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होईल.

खानदेशातील भाविकांसाठी सुवर्णसंधी

खानदेशातील जळगाव, भुसावळ, चोपडा, यावल, एरंडोल, पाचोरा, भडगाव आदी भागातील हजारो भाविक दरवर्षी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी प्रवास करतात. ही नवीन ट्रेन सेवा म्हणजे त्यांच्या प्रवासाला सोपं आणि सुलभ करणारी सुवर्णसंधी ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय

रेल्वे प्रशासनाने भाविकांची गरज ओळखून घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. स्थानिक भाविकांसाठी थेट ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देणे, ही वेळेची गरज होती. अशी सेवा भविष्यातही नियमित सुरू राहावी, अशीच अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम